loader image
[ays_poll id=7]

पुन्हा बेमोसमी पावसाची शक्यता – बळीराजा धास्तावला

Jan 21, 2022

सध्या राज्यात थंडीची लाट पसरलेली असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यातील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांसमोर पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे राहिले आहे.
यापूर्वी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 8 व 9 जानेवारीला अवकाळी पाऊस पडला. विशेषतः अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतरही भागातील शेतकर्‍यांना या पावसाचा फटका बसला. या नुकसानीच्या झळा ताज्या असतानाच पुन्हा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 21 , 22 आणि 23 जानेवारीला पाऊस होणार आहे. या पावसाचा फटका साधारणतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
.