Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतनमध्ये असिस्टंट इलेक्ट्रिशन कोर्स उत्तीर्ण लाभार्थ्याना प्रमाणपत्राचे वितरण

Jan 21, 2022

श्री एचएचजेबी तंत्रनिकेतमध्ये प्राधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत असिस्टंट इलेक्ट्रिशन कोर्सला मान्यता मिळाल्यानंतर प्रथम बॅच ३० सप्टेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आली. यासाठी चांदवड व परिसरातील ३० विद्यार्थ्यांनी प्राधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत असिस्टंट इलेक्ट्रिशन कोर्स साठी प्रवेश घेतला होता. या परिक्षेत ९३% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.व्ही. ए. वानखेडे यांनी दिली. सर्व कोराना नियमांचे पालन करून दिः ३० व ३१ डिसेंबर २०२१ रोजी हि परिक्षा घेण्यात आली. PMKVY ट्रेनिंग सेंटर्स (TCs) मध्ये दिले जाणारे अल्पकालीन प्रशिक्षण भारतीय राष्ट्रीयत्वाच्या उमेदवारांना लाभदायक ठरते], जे एकतर शाळा/कॉलेज सोडलेले आहेत किंवा बेरोजगार आहेत. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) नुसार प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त, ट्रेनिंग सेंटर्स सॉफ्ट स्किल्स, उद्योजकता, आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देखील देतात. प्रशिक्षणाचा कालावधी प्रत्येक नोकरीच्या भूमिकेनुसार बदलतो, १५० ते ४२६ तासांच्या दरम्यान असतो. त्यांचे मूल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, उमेदवारांना प्रशिक्षण भागीदार (TPs) द्वारे प्लेसमेंट सहाय्य प्रदान केले जाते. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य श्री राजेद्रकुमारजी बंब, मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले .

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]