मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
गिरणानगर ग्रामपंचायत चे सरपंच उप सरपंच सह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरालगत असलेल्या गिरणानगर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.अनिता राहुल पवार...








