Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माजी सैनिक व विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सूट मिळावी : विनय आहेर !

Jan 22, 2022

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना अंतर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्यात यावी, या मागणीचे निवेदन मनमाड नगर पालिकेचे नगरसेवक विनय आहेर यांनी मनमाड नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अशोक पाईक यांना दिले .

महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांना तसेच सैनिक विधवा / पत्नी यांना मालमत्ता करातून सुट देणे बाबत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नावाने माजी सैनिक सन्मान योजना जाहीर केली आहे. आज पावेतो मनमाड नगर परिषदेमध्ये मनमाड शहरातील रहीवासास असलेल्या व मालमत्ता धारक माजी सैनिकांनी मालमत्ता करातुन सुट मिळणे कामी उपरोक्त शासन निर्णयानुसार मागणी अर्ज सादर केले आहे तसेच सदरील योजना लागू करणे बाबत आदेशीत करुन अहवाल मागविण्यात आलेला असतांनाही अद्याप पावेतो मनमाड नगर परिषदेकडुन सदरील शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने माजी सैनिकांना सदरील योजनेचा लाभ मिळत नाही. सदरील योजना त्वरीत लागु करुन माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना मालमत्ता करातुन सुट देण्यात यावे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी विनय आहेर, माधवराव बच्छाव, निवृत्ती शेळके आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]