loader image
[ays_poll id=7]

प्रदेश भाजपाच्या निबंध स्पर्धेत वैभव अलई विजेते.

Jan 23, 2022


भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत वैभव अलई यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.भाजपा प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही श्री.भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक – वैभव अनिल अलई, (नाशिक), द्वितीय क्रमांक – वर्षा आबासाहेब अहिरराव,(जळगाव) तृतीय क्रमांक (विभागून )मानसी मंगेश सावर्डेकर ( ठाणे) आणि प्रज्ञा दर्भे, (बोरिवली).

प्रतिभा पोतदार, सुनील नातू, महेंद्र गेल्ये, कविता अरुण हिरे, आकाश गोवरे, मोहन अत्रे, शैलजा मधुकर रानडे, सागर आव्हारे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली आहेत, अशी माहितीही श्री.भांडारी यांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.