शहरातील शिवाजी नगर परिसरातील दरगुडे वस्ती येथे शेतातील दोन पाणबुडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बंडू दरगुडे रा.शिवाजी नगर यांच्या फिर्यादी वरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मच्छिंद्र बंडू दरगुडे तसेच त्यांच्या शेजारील शेतकरी बंडू उखाजी सांगळे यांच्या यांच्या विहिरीवरील दोन विद्युत पाणबुडी मोटार चोरीला गेल्या निदर्शनास आले.शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.ह.नरोटे करीत आहेत
नांदगाव – वेहळगाव रोडवर वादळाने पडलेले झाड ठरतोय रहदारीला अडथळा
नांदगाव : मारुती जगधने दि ५ मे रोजी नांदगाव तालुक्यात प्रचंड वादळ वारा आणी गारांचा पाऊस...









