loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

May 16, 2024


 

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 16 संघाची निवड चाचणी नुक्तीच पार पाडण्यात आली. या चाचणीसाठी विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातील अंडर 16 वयोगटातील खेळाडुंनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल , आर्यन भंडारी यांची संभावित खेळाडुंच्या यादित निवड झाली होती व त्यानंतर या खेळाडुंना कन्नड जि. संभाजीनगर जिल्ह्यात होणार्या निवड चाचणी सामण्यात खेळण्याची संधी मिळाली. या निवड चाचणी सामन्यांमध्ये आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर या खूळाडुंनी नंदुरबार जिल्हा अंडर 16 संघात आपले स्थान मिळवण्यास यश प्राप्त केले आहे तसेच आर्यन भंडारी हा नाॅर्थ झोन संघासाठी निवडला गेला.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत नंदुरबार संघाचे सामने हे सोलापुर तसेच निरर्थक झोन संघाचे सामने नाशिक येथे मे महिन्यात खेळवले जाणार असुन आपल्या मनमाडचे हे नवोदित खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.
मनमाडच्या या सर्व खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्याची महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिल्या जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करुन महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी हे खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड येथे कसुन सरावही करत आहे. नंदुरबार जिल्हा असोसिएशन चे सचिव युवराज पाटिल सर यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले.

या निवडीसाठी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, चिराग निफाडकर, शुभम बिडगर , रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.