मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी रविवार २३ जानेवारी रोजी निधन झाले. बाळासाहेब पाटील यांनी मनमिळाऊ व मितभाषी स्वभावाने शहर,जिल्हा, राज्य तसेच पर राज्यात ही मोठा मित्रपरिवार जोडला होता.राष्ट्रीय शिक्षण संस्था,जय भवानी व्यायामशाळा तसेच त्यांनी स्थापन केलेल्या युवक क्रांती मंडळाने अनेक तरुण जोडत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता शोकसभेचे आयोजन युवक क्रांती गणेश मंडळ, तिरंगा ग्रुप, इंदिरा कॉलनी व सर्व मित्र परिवाराच्या वतीने पल्लवी मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश
दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये...










