काँग्रेस चे माजी आमदार रशीद शेख यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून आज महापौरांसह काँग्रेस चे २७ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत त्यांचेसह महापौर ताहेरा शेख तसेच काँग्रेस चे २७ नगरसेवक उपस्थित होते.त्या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.श्री.शेख यांचे पुत्र माजी आमदार असिफ शेख यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादित प्रवेश केला आहे. मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि निधींची गरज आहे परंतु महविकास आघाडीचे सरकार सत्तेत असूनही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे आमची नाराजी अधिकच वाढत गेली
सहकारी बँकेवर १० वर्षे संचालक राहिलेले अपात्रच : सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
राज्यातील सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक म्हणून सत्ता गाजविलेल्यांना आता या बँकांवर काम...










