Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात बैलजोडी आणि गाय चोरीला

Jan 28, 2022

मनमाड शहरात एका शेतकर्‍याच्या शेतातील गोठयामध्ये बांधलेली बैल जोड आणि एक जर्सी  जातीची गाय असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचे गोधन चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आत्तापर्यंत चोरटे घरफोडया करत होते. आता त्यांनी आपला चोरीचा मोर्चा जनावराकडे वळविल्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत माहिती अशी की यातील फिर्यादी रामलाल भगवान डिबंर, (वय -६१, रा. डिबंर मळा, मनमाड) यांचे मनमाड शहरालगत मनमाड येवला रोडवर डिबंर मळा म्हणून शेतात वस्ती असून घराजवळ असलेल्या गोठ्यात २५  हजार रुपये किमतीचे बैल जोड बांधले होते तर बाजूलाच जर्सी जातीची सुमारे २० हजार किंमतीची गाय बांधली होती असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचे गोधन चोरट्याने मालकाच्या संमतीशिवाय चोरून नेला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार व्यापारे हे करीत आहेत. बैलजोडी आणि गाय चोरून नेल्यामुळे पशुपालकांत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यापुर्वी चोरट्यांनी मनमाड शहर व ग्रामीण भागात घरफोडया व मोटार सायकली पळविल्याच्या घटना असतानाच आता चोरट्यांनी आपला मोर्चा पशुपालकांच्या जनावरांकडे वळविला आहे. पशुपालकांची जनावरे शेतामधून मोकळया ठिकाणी कुठेही बांधलेली असल्याने चोरटयांना चोरी करणे शक्य होत असल्याने जनावरांना ते टार्गेट करीत असल्याची चर्चा आहे. पोलिस या गाय आणि बैलजोडीचा शोध लावणार का ? असा सवालही पशुपालकांमधून केला जात आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]