Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठी भाषा संवर्धन बाबत कार्यक्रम मनमाड न्यायालयात संपन्न.

Jan 29, 2022

मनमाड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि.14/01/2022 ते 28/01/2022 पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याची सांगता दिनांक 28/01/2022 रोजी करण्यात आली, त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सरकारी वकील अॅड. गिरीश पवार ह्यांनी मराठी भाषेचा इतिहास याबाबत माहिती दिली, तसेच तालुका विधी सेवा समिती चे पॅनेल सदस्य अॅड. रमेश बी.अग्रवाल ह्यांनी मराठी भाषा ही भारतातील 22 अधिकृत भाषा पैकी एक भाषा असुन भारतातील क्र.3 ची व संपुर्ण जगातील क्र.10 ची अशी समृद्ध भाषा आहे असे नमुद केले तसेच अॅड. डी.बी. देसले ह्यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे,पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतुन शिक्षण दिले पाहिजे असे नमुद केले तसेच मनमाड न्यायालयातील न्यायमूर्ती लोमटे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले राज्यातील मराठी भाषा न्यायालयीन कामकाजातील प्रमुख भाषा असुन बरेचसे निकाल व हुकुम मराठी भाषेत पारीत केले जातात असे असे सांगितले व न्यायालयीन कामकाजात जास्तीतजास्त मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहन केले. तसेच मनमाड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे ह्यानी प्रस्तावना सादर करताना मराठी भाषा व त्याचा न्यायालयीन कामकाजात असलेले महत्त्व याबाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. के.एम. चोरडीया ह्यांनी केले, कार्यक्रमास रेल्वे न्यायालयातील न्यायमूर्ती घुले साहेब, मनमाड वकील संघाचे अॅड. पालवे, अॅड.बापट, अॅड. निकम, अॅड. महाजन, अॅड. पुजा मल्हारे, अॅड. व्यवहारे, अॅड. बनकर, अॅड. पठाण व इतर पदाधिकारी व सदस्य व न्यायालयातील सहा.अधीक्षक शिरूडे भाऊसाहेब, श्री निकम भाऊसाहेब व इतर न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]