जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी नासिक यांचे मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी यथे रु. १ कोटी ९८ लक्ष रकमेच्या नळ पाणी पुरवठा योजनेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी नुकतीच प्रशासकिय मान्यता दिली आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती आर्कि. अश्विनी अनिल आहेर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे योजना मार्गी लागली असुन न्यायडोगरी येथील ग्रामस्थांना नळाव्दारे पिण्याचे पाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे स्थानिक महिलांचा मोठा त्रास वाचणार आहे. सदर योजनेची लवकरच जाहीर निविदा प्रसिध्द करुन कामाची सुरुवात करणार असुन मार्च २०२२ पुर्वी योजना कार्यान्वीत करण्याचा मानस असल्याचे सभापती आकिं. अश्विनी अनिल आहेर यांनी सांगितले.
नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन
वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून...









