सौभाग्याचं लेणं समजलं जाणारं हळदी कुंकवाचा हा उत्सव सोबत तीळ गुळाचा गोडवा आणि वान वाटून मनमाड शहर युवती सेनेच्या महिलांनी शहरातील भाजी मंडई तील महिलांसोबत हा सण आनंदात साजरा केला.
आमदार सुहास कांदे, सौ.अंजुम कांदे आणि युवासेना जिल्हाधिकारी फरहान खान यांच्या नेतृत्वात मनमाड युवती सेने च्या उपतालुका युवती अधिकारी सौ पूजा छाजेड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या प्रसंगी युवती सेनेच्या सर्व महिलांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. भाजी मंडई तील महिलांना हळदी कुंकू लावून, तिळगुळ वाटप केले सोबत वान ही देत आनंदात हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी अंजली सुर्यवंशी, बुशरा शेख, पल्लवी राजगुरू, श्रुती बोरसे, श्रुष्टी देशमुख, ममता जाधव, दीक्षा झाल्टे, अर्चना राजगुरु, शितल आरणे, स्वाती अवचरे, रुपाली थोरात सिमरन उपस्थित होत्या.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार
विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...










