तथागत गौतम बुद्धास ज्या बोधिवृक्षा खाली तपश्चर्याती दिव्यज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्धगया येथील बोधिवृक्षाचे पान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थी व सध्या ८ – महार रेजिमेंट परमवीर चक्र बटालियन कोलकात्ता (भारत) शिपाई आयुष्यमान समाधान सुदाम कु-हाडे,पद-शिपाई-(रा.शिरसगांव लौकी,ता.येवला) यांनी बुद्धगया येथून आणलेले बोधिवृक्ष पान येवला येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका यांस भेट दिले. विद्यार्थी बंधू किरण व प्रशांत कुऱ्हाडे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद विमल दिनकर यांचेकडे अॅचिवर्स हा ग्रंथ हि भेट दिला. यावेळी अभ्यासिकेचे विद्यार्थी राजरत्न वाहुळ, सचिन बोढारे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
फलक रेखाटन दि. १० एप्रिल २०२५ भगवान महावीर जयंती
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तीमंत प्रतिक होते. बिहार मधील मुजफ्फरपुर...










