जिल्हापरिषद नाशिक आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसिकरणासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून मनमाड शहरासाठी असलेल्या रुग्णवाहिकेची उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे आणि डॉ. सचिन आहिरे यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी नगरसेवक प्रमोद पाचोरकर यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. नांदगाव आणि मनमाड शहरात या रुग्णवाहिकेद्वारे गल्लो – गल्ली आणि मोहल्यात जाऊन फिरते कोविड लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...










