Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्लास्टिक पुनर्वापर चळवळीतील संकलित प्लास्टिक पिशव्या मनमाड नगर परिषदेला सुपूर्द

Feb 3, 2022

पल्लवी मंगल कार्यालय आणि केटरर्स चे संचालक श्री विकास काकडे , श्री आंनद काकडे आणि काकडे परिवार यांच्या कडून काही दिवसांपूर्वी “स्वच्छ मनमाड व प्लास्टिक पुनर्वापर चळवळ” ही संकल्पना राबवण्यात आली होती.

या मध्ये मनमाड शहरातील जवळ-जवळ शंभर पेक्षा अधिक नागरिकांना एक तारीची आकडी करून वाटण्यात आली होती , या आकडी मध्ये घरात जमा होणाऱ्या किराण्यातील , बाजारातून आणलेल्या वस्तुंच्या ,रोजच्या वापरात येणाऱ्या प्लास्टिक च्या पिशव्या जमा करायच्या आणि या मध्ये ज्या प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हा वापर करता येईल त्या या मधुन वेगळ्या काढून पुनर्वापर करायच्या या मुळे प्लास्टिक पिशव्यांचा मर्यादित वापर होईल.अशा प्रकारची अतिशय सोपी आणि तेवढीच पर्यावर्णासाठी अतिशय उपयोगी चळवळ ही राबवण्यात आली. या अंतर्गत संकलित झालेले प्लास्टिक आज ०३/०२/२०२२ रोजी येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मुंढे साहेब व श्री. सोनवणे साहेब यांचे सह नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हे प्लास्टिक वेस्टणे व प्लास्टिक पिशव्या प्रातिनिधिक स्वरूपात पुनर्वापर साठी सुपूर्द करण्यात आल्या . ह्या प्रसंगी श्री. मुंढे साहेब यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यातून पर्यावरणाची होणारी हानी याचे महत्त्व सांगितले .ह्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे शहरातील ओमप्रकाश प्रोविजन चे संचालक श्री. मुन्ना शेठ गुप्ता यांना पर्यावरण मित्र असे सन्मान पत्र देण्यात आले , तसेच उपक्रमासाठी प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले .

श्री. विकासदादा काकडे यांनी उपक्रमाची माहिती उपस्थितांसमोर विषद केली व त्याचे महत्त्व पटवून दिले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. आनंद काकडे यांनी केले .
ह्या उपक्रमासाठी मनमाड येथील युवा उद्योजक श्री. राजेंद्र निमसे तसेच वेळोवेळी सहकार्य करणारे पल्लवी केटरर्स चे सहकारी श्री. सोमनाथ खैरनार , श्री. राजेंद्र हजारे , राकेश गांगुर्डे , सचिन आहीरे , दीपक पानपाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]