आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तसेच प्रहार अपंग क्रांती सेना संघटनेच्या सहकार्याने नांदगाव मतदार संघातील दिव्यांगांना पिवळी शिधापत्रिका चे वाटप तहसिलदार सिद्धार्थ मोरे,शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे,प्रहार चे अपंग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष अनिस शेख अब्बास यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे उपसभापती राजाभाऊ देशमुख, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे,अय्याज शेख आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
मनमाड शहरात कायमस्वरूपी, कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडल अधिकारी नियुक्त करण्याची भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
मनमाड :- मनमाड शहर हे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मोठे शहर आहे, परंतु...











