loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथील २६१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा .

Sep 15, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द सह शेजारील गावातील शेतशिवाराचे ऑक्टोबंर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते .नांदगाव तहसिलदार कार्यालयातील तत्कालीन लिपीक व अव्वलकारकुन यांच्या चुकीने वंचीत राहिलेल्या २६१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून दि. १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक ७५३ जळगाव खुर्द येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जळगाव खुर्द सह शेजारील गावांच्या शिवारात शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा म्हणून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेवून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई ची रक्कम नांदगाव तहसीलदार यांच्या खात्यात वर्ग केली.त्यानुसार जळगाव खुर्द वगळता परिसरातील सर्व गावातील शेतकर्‍यांना सदर नुकसान भरपाई मिळाली व या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान झालेल्या जळगाव खुर्द येथील शेतकर्‍यांना मात्र नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले. जळगाव खुर्द ता.नांदगाव येथील २६१ शेतकरी खातेदार नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असून सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतातील नुकसानीचा पंचनामा संबंधित यंत्रणेने केला असून तसा अहवाल तहसीलदार कार्यलयाकडे सादर आहे.मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे जळगाव खुर्द ता.नांदगाव येथील काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अनुदान रक्कम बँक खात्यावर वर्ग झालेली नाही.याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने तत्कालीन कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे नाशिकचे जिल्हाधिकारी व नांदगाव तहसील कार्यालयात वंचित शेतकऱ्यांच्या अर्जावरून व त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जळगाव खुर्द ता.नांदगाव जि.नाशिक येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीची भरपाई शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शेतकरी खातेदार यांचे बँक खात्यावर वर्ग होणेकामी पुराव्यांसह अर्ज सादर
केलेला असून त्याची नांदगाव तहसील कार्यालयातील संबंधित विभागातील कर्मचारी वर्गाने कुठलीही दाखल घेतलेली नाही. या गंभीर प्रश्नाबाबत नांदगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे जळगाव खुर्दचे शेतकरी हे तीन वर्षापासून या नुकसान भरपाई पासून वंचित राहिले असून याबाबत वरिष्ठ स्तरावरून गांभीर्याने निर्णय घेवून बुधवार दि.१४.०९.२०१९ पर्यंत २६१ वंचित शेतकरयांची नुकसान भरपाई रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्याने गुरुवार दिनांक १५.०९.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी वंचित २६१ शेतकऱ्यांसह नांदगाव येथील तहसीलदार यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण केले .मात्र जिल्हाधिकारी कार्यालायाकडून मागणी केलेले अनुदान मिळणेबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी,प्रशासनाची झालेली अडचण लक्षात घेता सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित करणेबाबत नांदगाव येथील तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी केलेल्या विनंतीवर वंचित शेतकऱ्यांनी बैठकीत चर्चा केली असता नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालक्यातील जळगाव खुर्द शिवारातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान होऊनही शासकीय मदत न मिळालेले वंचित शेतकरी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करून दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सदर अनुदान जमा करावे अन्यथा दि.१७.१०.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव खुर्द येथील बसस्थानक येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे वर रास्ता रोको आंदोलन करण्याचा तसेच या आंदोलनाची संपर्ण जबाबदारी ही नांदगाव तहसीलदार कार्यालयाची असेल इशारा जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.