loader image
[ays_poll id=7]

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन !

Feb 6, 2022

सर्वसामान्यांच्या तक्रारी, अडचणींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी नाशिकमध्ये सोमवारी, 7 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती सभागृह येथे हा लोकशाही दिन होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी लोकशाही दिनासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस आयुक्तालय असल्यास अथवा पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणीपुरवठा समन्वय अधिकारी यांची उपस्थिती असते. त्यामुळे संबंधित तक्रारदाराच्या अडचणीचे तात्काळ निवारण होते. त्याला जलद न्याय मिळतो.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या अंमलबजावणीसाठी 26 सप्टेंबर 2012 च्या शासन परिपत्रकातील निकषांनुसार पाठविण्यात येणारे अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. याकरिता चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता पाठविण्यात येणारे अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत सादर करावे, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी, तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावेत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी कळविले आहे. तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व किंवा अपिल्स, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति न जोडलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असेही शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.