loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट संघाची नाशिक संघावर मात : हसन शेखचे शतक !

Feb 7, 2022

नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिऐशन आयोजित माॅन्सुन लीग या स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी ने एन.डि.सी.ए अंडर १४ नाशिक संघावर पहिल्या डावाच्या जोरावर मोठा विजय प्राप्त केला.एक दिवसीय कसोटी सामन्यामध्ये मनमाड संघाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचे ठरवले.नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना २७.२ षटकात मध्ये १० गडी गमावुन ५५ धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक बळी कु. कुशाल परळकर (३ बळी) व सार्थक शिंदे (३ बळी) मिळवले. यासोबत आयुष व्यवहारे २ बळी व यशवर्धन बरवट १ बळी मिळवला. ५५ धावांच्या प्रत्युतरात मनमाड संघाने १८५ धावा केल्या ज्यामध्ये सर्वाधिक धावा कर्णधार हसन शेख ( १२८ धावा) यानी बनवल्या. आपल्या पहिल्याच शतकाच्या जोरावर हसन शेख याने आपल्या संघास सहज विजय प्राप्त करुन दिला. नाशिक संघाच्या दुसर्या डावांत १२ षटकानंतर खेळ थांबवण्यात आला ज्यामध्ये नाशिक संघ ५ बाद ३० धावाच बनवु शकले. यात कुशाल परळकर ३ बळी, सार्थक शिंदे १ बळी मिळवण्यात यशस्वी ठरले.सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा कु.कुशाल परळकर हा सामनावीर ठरला.भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाडचे संचालक व कोच सिध्दार्थ रोकडे यांनी या खेळाडुंना मार्गदर्शन केले.भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाडचे मार्गदर्शक गणेश धात्रक, राजेंद्र पगारे, सुनील पाटील, श्रेणिक बरडिया, भुषण शर्मा, वाल्मिक रोकडे, परवेज शेख, कौशल शर्मा, हबीब शेख, शुभम गायकवाड, सिद्धार्थ बरडीया, नितिन आहेरराव, विक्रम साहु, परेश राऊत, जी एल एस ग्रुप यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ इरफान मोमीन यांनी अभिनंदन करुन पुढील सामन्यांसाठी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.