भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली , त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ वी जयंती बुद्धवाडी येथील कपिल वस्तु बुद्ध विहारात उत्साहात साजरी करण्यात आली.
बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.सचिव अशोक गरुड यांनी माता रमाई कार्याला उजाळा दिला.कार्याध्यक्ष भागवत गांगुर्डे गुरुजी यांनी बुद्ध वंदना घेतली. सर्वश्री गणेश केदारे,कारभारी मोरे, सावकाश केदारे,राजेंद्र जाधव, लाला शेजवळ, मिलिंद गांगुर्डे ,गौतम केदारे, विशाल वाघ ,सचिन संसारे ,संजय जाधव ,पत्रकार निलेश वाघ तसेच शांताबाई डांगळे, निर्मलाबाई अंकुश,कलाबाई एळीजे,चित्राबाई अंकुश ,संजीवनी गरुड,ताईबाई केदारे सुमनबाई अंकुश,कामिनीबाई केदारे ,संगीताबाई जाधव ,अनिता केदारे,लक्ष्मीबाई वाघ अंजनाबाई केदारे आदींसह बौद्ध उपासक- उपासिका मोठ्या संख्येने होते.
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष
मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...











