Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अर्धवट अवस्थेतील रोडचे काम त्वरित मार्गी लावण्याची व्यापाऱ्यांची आग्रही मागणी

Feb 8, 2022

मनमाड शहरातील आझाद रोड येथील व्यापारी बांधवानी गेल्या पाच महिन्यापासुन अर्धवट अवस्थेत बंद पडलेल्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात यावे यासाठी प्रशासनास निवेदन दिले.

शहरातील आझाद रोड परिसर हा मुख्य बाजारपेठ असणारा परिसर असल्याने येथे ग्राहकांची आणि नागरिकांची नेहेमी वर्दळ असते , गेल्या सप्टेंबर महिन्यापासुन येथील रस्त्याचे काम हे अर्धवट अवस्थेत असुन जुना रस्ता फोडण्यात आलेला आहे. यामुळे येथील व्यापारी वर्ग , ग्राहक , जेष्ठ नागरिक , महिला वर्ग , वाहन चालक यांना खुप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असुन , फोडलेल्या रस्त्यामुळे संपुर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य होत असते , याचा परिणाम येथील व्यवसायावर आणि व्यावसायिकांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच रोज येथे मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असुन भविष्यात येथे मोठा अपघात देखील होऊ शकतो , तरी लवकरात लवकर या निवेदनाची दखल घेऊन अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन आझाद रोड येथील व्यापारी वर्गाकडून देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]