Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वेहेळगाव सब स्टेशन मध्ये अतिरिक्त फिडर चे उद्घाटन संपन्न

Feb 9, 2022

वेहेळगाव येथील वीज वितरण कंपनीचे 33/11kv चे विद्युत उपकेंद्रा मध्ये दोन फीडर नव्याने बसवण्यात आले असून या नवीन फिडरचे उदघाटन आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. वेहेळगाव सब स्टेशन मधून कमी दाबामुळे विद्युत पुरवठा होत असल्यामूळे सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिसरातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन वीज वितरण कंपनीस अतिरिक्त फिडर बसून देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार वेहेळगाव सबस्टेशन मध्ये दोन अतिरिक्त फिडर बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ नारळ फोडून आज केला. नव्याने बसविण्यात आलेल्या फिडर मुळे वीज पुरवठा उच्च दाबाने मिळणार असून याचा फायदा वेहेळगाव, कळमदरी, आमोदे, बोराळे, जामदरी, तळवाडे या गावातील शेतकरी व नागरिकांना होणार असल्याने उपस्थित पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोबत शिवसेना तालुकाप्रमुख किरणभाऊ देवरे, अमोलशेठ नावंदर वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. वाटपाडे साहेब व सहाय्यक अभियंता श्री. सोनटक्के साहेब आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात अनावरण : निर्भय महिला सामाजिक संस्थेतर्फे जल्लोष

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात अनावरण : निर्भय महिला सामाजिक संस्थेतर्फे जल्लोष

(सुभाष जाधव)दीनांक 14-9-2022 रोजी साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात...

read more
चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण न्यू इंग्लिश स्कूल येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत पोषण महा अभियान संपन्न

चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण न्यू इंग्लिश स्कूल येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत पोषण महा अभियान संपन्न

(सुभाष जाधव,चांदवड)दिनांक 16 सप्टेंबर रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण महा अभियान सर्वत्र...

read more
इकरा गर्ल उर्दु हाय स्कुल मध्ये अंगणवाडी ताई  घेत आहेत किशोरी साठी विविध उपक्रम – राजश्री निकम अंगणवाडी सेविका

इकरा गर्ल उर्दु हाय स्कुल मध्ये अंगणवाडी ताई घेत आहेत किशोरी साठी विविध उपक्रम – राजश्री निकम अंगणवाडी सेविका

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक - २.मनमाड येथील अंगणवाडी ताईनी मनमाड मधील ईकरा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]