Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड लासलगाव रोड वरील खुनाच्या घटनेतील आरोपीस २४ तासात अटक : चांदवड पोलिसांची कामगिरी

Feb 9, 2022

दोन दिवसांपूर्वी मनमाड लासलगाव रोडवर वाघदर्डी धरणाजवळ पडीत जागेवर चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथील जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या अनिल रतन आहीरे या इसमाचा अंगावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अज्ञात आरोपीविरोधात भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा क्रमांक ४७/२०२२ दाखल करून चौकशी सुरु केली होती.मनमाड चांदवड रोड वरील सी सी टी वी फुटेज च्या आधारे संशयित इसमाची माहिती घेवून गंगावे ता. चांदवड येथे जाऊन खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मयत अनिल आहीरे संदर्भात चौकशी केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने खुनाची कबुली दिली.चांदवड पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून पुढील तपासासाठी ५ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास मा.पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील व उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड चे पोलीस निरीक्षक समीर बारावकर हे करीत आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पो.नी हेमंत पाटील,समीर बारावकर, सपोनि सागर शिंपी,पोउपनि संदीप पाटील,मुकेश गुजर,सहापोउपनि विठ्ठल बागुल, पोलीस हवालदार सोनवणे,पोना लोखंडे, गांगुर्डे, कुणाल मोरे यासह मनमाड पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]