मनमाड नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल यांनी पालिकेचे पदभार स्विकारल्याबद्दल मनमाड सिटुं संघटना व कामगार सेनेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल यांनी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या नागरीकाच्या मुलभुत सुविधा पुरविण्यात याव्या , दैनदिन स्वच्छता करावेत , मास्क लावा संकट टाळा , सोशल अंतर, प्लास्टिक बंदी , झाडे लावा झाडे जगवा , पाणी जपून वापरावेत पाणी वाचवा व जनहितार्थ जनजागृती व्दारे संदेश करावेत ,नेमुन दिलेल्या नुसार सेवा दयावेत कामचुकार हलगर्जी पणा करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही असे सांगण्यात आले यावेळी राजेंद्र पाटील नाना जाधव , रामदास पगारे , नितीन पाटील , आनंद ऑटी ,विजयकुमार सोनवने , किशोर आही रे , विकास गायकवाड , बाबा दराडे , शरद बोडखे , दिनेश करोसीया , जॉनी जॉर्ज , विलास कातकडे , संदीप आगवणे, किरण कवडे , सागर अहिरे , व मोठ्या संख्येने बालवाडी शिक्षीका , नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
फलक रेखाटन : दि.१४ एप्रिल २०२५ भीम जयंती “भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळल !”
कला शिक्षक देव हिरे यांचे बाबासाहेबांना शालेय फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून अनोखं अभिवादन....











