नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था, संचालित एम. डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन व अध्यक्ष दिनेश काळे सर व शाळेच्या प्राचार्य नेहा काळे हे प्रमुख अतिथी उपस्थिती होते. शिक्षक, नर्सरी ते 8 वी पर्यतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिवरायांच्या जीवनावर सुंदर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरसे सर व इंगोले यांनी केले तर देवकर यांनी अनुमोदन दिले. शिक्षिका पुजा यांनी आभार प्रदर्शन केले.











