आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 392 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष दिलीप आबा पाटील होते .या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरुड प्रतिमा साकारण्यात आली. क्रीडा शिक्षक श्री आहेर बी एम सर यांनी चांगल्या प्रकारे लेझीम पथक तयार करून कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात महाराजांचा जीवन परिचय सांगितला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोटे सर यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांची समाजाविषयी असलेली भावना विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .याप्रसंगी श्री काकळीज सर, पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम ,सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले . आभार प्रदर्शन श्री शेवाळे सर यांनी केले.
मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना
मनमाड :- मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना करण्यात आली असून नाशिक...










