Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आरती दाभाडे सोनवणे हिच्या हत्येचा तीव्र निषेध

Feb 23, 2022

शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आज सौ आरती दाभाडी सोनवणे यांच्या मृत्यूचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.याबाबतचे निवेदन मनमाड उप विभागिय उपअधीक्षक संग्रामसिंह साळवे तसेच पोलिस निरीक्षक गीते साहेबांचे नावे निवेदन देण्यात आले.मनमाड येथील सराफ व्यापारी अरुण सोनवणे यांची मुलगी सौ.आरती हिचा शारीरिक छळ करून, सासरच्या इसमांनी आपसात संगनमत करून, आरती हीस मारहाण केली आणि सर्वांनी मिळून खून केला. खुनाचा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून खून केल्याचे सर्व पुरावे नष्ट करून सौ आरतीने आत्महत्या केल्याचा खोटा बनाव केला. अशा प्रकारे आरतीचे पती, सासू सासरे, दीर या सर्वांनी मिळून मानसिक छळ करून तिला जीवे मारले आहे.याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हा उपप्रमुख मुक्ताताई नलावडे, कल्पनाताई दोंदे, संगीताताई बागुल, नांदगाव तालुका प्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर विभाग प्रमुख संगीताताई सांगळे, शाखाप्रमुख उषाताई शिंदे, युवती सेना उपतालुका अधिकारी पूजाताई छाजेड, सपना महाले युवती सेना मनमाड शहर अधिकारी अंजली सूर्यवंशी, नाजमा जाफर मिर्झा आदिंसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट

चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट

चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जन संवाद यात्रेत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल कृषी उत्पादन बाजार...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]