बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.अंगणवाडी क्रं-68,आनंदवाडी, मनमाड विभाग येथे प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आधारित कार्यक्रम (CBE)अंतर्गत नविन गरोदर नाव नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गरोदर स्त्रिने सरकारी दवाखान्यात गरोदरपणाची नाव नोंदणी करणे तसेच प्रसुती पूर्व चार तपासण्या करून नोंदी कराव्या. रक्त वाढीच्या व कॅल्शियमच्या गोळ्या नियमित घ्याव्या. टी टी चे इंजेक्शन घ्यावे. संतुलित आहार व दोन तास दिवसा ही विश्रांती घ्यावी तसेच रात्री आठ तास झोप घ्यावी. उपस्थित महिलांना पोषणाची पाच सुत्र- 1)बाळाचे पहिले हजार दिवस 2)पौष्टिक आहार 3)अँनेमिया 4) अतिसार 5) स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले.
 
														एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...










