Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संत गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर संत समाजसुधारक- प्राचार्य डॉ अरुण पाटील

Feb 23, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या मनोगतातून समाजातील अज्ञान,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी दोषांवर गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे कठोर प्रहार केले व लोकजागृती केले.संत गाडगेबाबा कुठल्याही शाळा-कॉलेजात गेले नव्हते पण संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे तोंडपाठ होते.

गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते. समाजातील अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लोक शिक्षणाचा वसा घेतला इत्यादी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी.बी.परदेशी यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ पी. जी. आंबेकर, कुलसचिव समाधान केदारे, तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व प्रसिद्धी विभागातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]