Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव साजरा….

Feb 24, 2022

शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्सव मनमाड शहर आणि परिसरात साजरा करण्यात आला. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना ‘गिणगिणेबुवा’, ‘गजानन महाराज’ अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात.

मनमाड शहरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणा मध्ये श्री गजानन महाराज प्रगट दिन साजरा करण्यात येत असतो, यंदाच्या वर्षी देखील श्री गजानन महाराज प्रगट दिन भक्ती भावाने साजरा करण्यात आला.मनमाड येथील श्री शिवाजी महाराज नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते,या वर्षी देखील सकाळी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक पुजन ,प्रगटदिना निमित्त निरूपण , गजानन विजय ग्रंथाचा पहिल्या अध्यायाचे वाचन , महाआरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले.श्री गजानन महाराज मंदिरामध्ये प्रभु श्री राम , श्री लक्ष्मण , माता सीता यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.

मनमाड येथील नांदगांव रोड वरील श्री ललवाणी परिवार यांच्या श्री गजानन महाराज मंदिरामध्ये देखील दरवर्षी प्रगट दिन सोहळा मोठया भक्ती भावाने साजरा करण्यात आला , या निमित्त महाराजांची महापुजा , मिरवणुक आणि महाआरती करून या सोहळ्याला मनमाड आणि परिसरातील उपस्थित भाविकांना श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड  शहरातून  1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

धन्यवाद मोदीजी अभियान : मनमाड शहरातून 1500 पेक्षा जास्त लाभार्थी चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आभार पत्रलेखन

महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे अभिनव संकल्पने तून सुरु असलेल्या...

read more
आज कार्तिकी एकादशी….शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडा भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

आज कार्तिकी एकादशी….शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडा भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड : ( योगेश म्हस्के)आज कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते , या...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.एम.एम.श्री.आर.एल.राणा(मुंबई) यांना निवेदन देण्यात आले

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.एम.एम.श्री.आर.एल.राणा(मुंबई) यांना निवेदन देण्यात आले

मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य सामग्री प्रबंधक श्री.आर.एल.राणा (मुंबई) हे मनमाड वर्कशॉप ला भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]