अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे, नुकताच एका चिमुकल्यावर विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविण्यात डॉ सुशील पारख यांच्या टीमला यश प्राप्त झाले.
३ वर्षाचे बाळ तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. आघात इतका प्रचंड होता की ,ज्या वेळेस बाळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले ते जवळपास मृत्यूच्या छायेत होते, अशा परिस्थितीत ज्यावेळेस तपासण्या करण्यात आल्या त्यावेळेस लक्षात आले की , बाळाच्या जवळपास बहुतेक अवयवाना क्षती प्राप्त झाली आहे. ज्यात बाळाचा मेंदू, डोक्याची कवटी, हृदय, दोन्ही हात, फुफुस, यकृत पोट, प्लीहा या सगळ्या अवयवांना गभिर इजा झाल्या होत्या व त्यामुळे बाळाच्या पोटात, मेंदूत व फुफुसा मध्ये अंतर्गत रक्तस्त्राव देखील झाला होता. ज्यावेळी बाळ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा त्याचा श्वास बंद होता, अंतर्गत रक्तस्राव मुळे ब्लड प्रेशर अगदी कमी झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी लगेच बाळाला रक्त दिले आणि इंटुबेट करून व्हेंटिलेटरवर श्वसन सुरू केले, लहान बाळ आणि त्याला झालेली इजा हे बघून डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे हृदय हेलावून गेले होते, परंतु अशोका मेडीकव्हरच्या सर्व डॉक्टरांनी हा विडा उचलला आणि उपचारांना सुरुवात केली.. या बाळाला झालेल्या अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे दोनदा पोटाची शस्त्रक्रिया ( ल्याप्रोटॉमी ) करण्यात आली.. बाळाला झालेल्या दुखापतीसाठी बाळाच्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया बाळ व्हेंटिलेटरवर असताना झाल्या, ज्यामध्ये प्रत्येक क्षणाला खूप जोखीम होती. परंतु डॉक्टरांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून बाळावर उपचार सुरु ठेवले आणि शेवटी बाळाला एक महिन्यानंतर संपूर्ण बरे करून घरी सोडण्यात आले यातून आपल्याला एकच म्हणावे लागेल,डॉक्टर रुपी देव तारी त्याला कोण मारी…!
या बाळाच्या उपचारांमध्ये डॉ. सुशील पारख यांच्या सोबत, डॉ शेखर चिरमाडे, डॉ तेजस साकळे, डॉ अमित राऊत, डॉ निखिल चल्लावार, डॉ रोहन शाह, डॉ किरण मोटवानी, डॉ नेहा मुखी,नर्सिंग हेड मनीषा कोलते… या सोबत बाल रोग विभागातील सर्व परिचारिका, सर्व वार्ड डॉक्टर्स, इंटेंसिविस्ट, फॅसिलिटी स्टाफ यांनी बाळाच्या उपचारांमध्ये सहभाग नोंदवला.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि एकत्रित प्रयत्न करून आपण अशक्यही शक्य करू शकतो ! याचे जिवंत उदाहरण म्हणजे, या बाळाचा वाचलेला जीव. तात्काळ तपासण्या, लगेचच झालेली शस्त्रक्रिया आणि त्यानंतर घेतली गेलेली काळजी या सगळ्याच्या जोरावर संपूर्ण टीम अविरत प्रयत्न करत होती, सर्व तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व उत्कृष्ट नर्सिंग केयर मुळे परिसथितीनुरूप उपचार करण्यात आम्हाला यश मिळाले.
डॉ सुशील पारख.
मेडिकल डायरेक्टर आणि बालरोग तज्ज्ञ.
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल,नाशिक
अत्यावस्त परिस्थितीतही रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक उपचार पद्धती आणि सगळे सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस एकाच छताखाली ह्या जमेच्या बाजू असतानाच रुग्णाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती समजून अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल ने विविध संस्था कडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. या संपूर्ण उपचारात हॉस्पिटल प्रशासनाने उत्कृष्ट उपचार उपलब्ध करून बाळाच्या पालकांना धीर देत आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले आणि त्या मुळे आज ह्या बाळाला पुनर्जन्म प्राप्त झाला.