वंजारवाडी ता.नांदगाव येथील वंजारवाडी विविध कार्य.से. पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले होते या निवडणुकीत मा.आ.संजय पवार तथा दीपक गोगड यांच्या प्रयत्नांना यश आले.संस्थेच्या सर्व १३ जागांवर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक तांबट यांनी जाहीर केले. सर्वसाधारण गटातून गोगड चंद्रकांत लूमचंद,शिंदे काशिनाथ जयराम, गूंडगळ बाळू सीताराम,शिंदे भागिनाथ दामू, लभडे भाऊसाहेब दामू, गुंडगळ शंकर सयाजी, गुंडगळ बाळासाहेब नामदेव, पवार संतोष माधव यांची तर इतर मागास वर्गातून गुंडगळ खंडेराव अंबु,महिला राखीव गटातून गुंडगळ सुशीला खंडेराव, गुंडगळ शांता दत्तू, अनु.जाती/जमातीतून पगारे सुधाकर भिमाजी तसेच भटक्या जा. जमातीतून गोसावी बाळू सटवा यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन मध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; नागरिक त्रस्त
मनमाड : बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा...











