loader image
[ays_poll id=7]

व्ही जे हायस्कूल मध्ये मराठी दीन साजरा

Mar 1, 2022


नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही.जे.हायस्कूल,येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिन,बालकवी संमेलन व विविध उपक्रमाच्या माध्यमातून मराठीचा जागर करण्यात आला.

मराठी भाषा दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले ,शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.राहुल नाईक,श्रीकांत सुरसे ,डॉ.विवेक काकळीज होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. संजीव धामणे होते.तसेच शशिकांत आंबेकर, विस्ताराधिकारी सोनवणे साहेब ,पत्रकार संजीव निकम, संदीप जेजूरकर,सुरेश शेळके,संजय मोरे, मान्यवर कवी उपस्थित होते.प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक कवी दयाराम अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून मराठी भाषेचे महत्व विषद केले.त्यानंतर मराठी दिनाविषयी माहिती नितीन भरसट यांनी दिली.प्रमुख पाहुणे प्रमोद चिंचोले यांनी आपल्या भाषणात यावेळी मराठी दिनाचे महत्व आपल्या कवितेतून सादर केले.अध्यक्ष संजीव धामणे यांनी मराठी दिन ज्यांच्या नावाने सादर करतो ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी होते याची माहिती देऊवून मराठी दिनाचे महत्व विषद केले. कवि संमेलनासाठी उपस्थित कवीच्या कविता विद्यार्थीनी सादर केल्या.त्याच बरोवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थाना उपस्थित कवीचे पुस्तके भेट देऊन गौरव करण्यात आला.तसेच NTS परीक्षेत राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती मिळविल्या बद्दल वेदांत घुगे याचा सत्कार करण्यात आला.मराठी दिनाच्या कार्यक्रमा नंतर प्रत्यक्षात बालकवी संमेलनास सुरवात झाली या कविसंमेलना साठी कवी विवेक उगलमुगले,रविंद्र मालुंजकर,राजेंद्र उगले,प्रशांत केंदळे,प्रमोद चिंचोले,दयाराम गिलाणकर,काशिनाथ गवळी,प्रतिभा खैरनार,भारती कुलकर्णी ,सौ.विद्या माळी हे कवी उपस्थित होते .प्रथम प्रशांत केंदळे यांनी माझी शाळा व बाप व मुलगी यावरभाष्य करणा-या कविता सादर केल्या. यानंतर सर्व कवींनी विविध कविता सादर करून दाद मिळवली. त्यानंतर रविंद्र मालुंजकर यांनी आपल्या सूत्रसंचलानातून आपल्या कविता सादर करून उपस्थिताची दाद मिळविली. प्रत्यक्ष कवींच्या भेटीमुळे एक वेगळा अनुभव विद्यार्थांना या कविसंमेलनातून मिळाला.या कार्यक्रमाला पालक शिक्षक संघ सदस्य ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियांका पाटील यांनी केले केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश गरुड व आभार गुलाब पाटील यांनी मानले या कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापक भास्कर जगताप ,भैय्यासाहेब चव्हाण व शाळेतील सर्व शिक्षकांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील पदाधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.