सोशल मीडियावर कच्चा बदाम हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले. कच्चा बदाम गाण्याचे गायक भुवन बडायकर यांना या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. भुवन यांना सोमवारी रात्री रूग्णालायात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, भुवन हे सेकंड हँड कार चालवायला शिकत होते. या दरम्यान त्यांची गाडी धडकली. या घटनेत भुवन हे जखमी झाले आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
युनियन बँक मुदत ठेव अपहार – देशमुख ला दहा दिवसांची पोलीस कोठडी
मनमाड - शहरात गाजत असलेल्या युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार बँकेतील कंत्राटी...











