loader image
[ays_poll id=7]

छत्रपती संभाजी राजेंनी मानले मराठा समाज आणि प्रसारमाध्यमांचे आभार

Mar 2, 2022

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेत असताना माझ्या कुटुंबातील कोणाला याची कल्पना दिली नव्हती;कारण, घेतलेल्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न झाले असते.
माझ्यासाठी हा कठीण काळ होता. लोकशाहीमध्ये मिळालेल्या घटनात्मक कक्षेत राहून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा लढा देण्याचा निर्धार माझ्या मनात पक्का होता. छत्रपती घराण्याची परंपराच कठीण काळात निर्भयणे व आत्मविश्वासपुर्ण सामोरे जाण्याची असल्याने घराण्याची पुण्याई माझ्या कामी आली.आणि या लढाई ला धीरोदात्तपणे सामोरा गेलो.
तुम्हा सर्वांच्या सदभावना, पत्नी संयोगीताराजे, व चिरंजीव शहाजीराजे यांची खंबीर साथ,वडील करवीरअधिपती शाहु छत्रपती महाराज,आईसाहेब याज्ञसेनी महाराज यांचे आशिर्वाद, शककर्ते श्री शिवाजी महाराज ,राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची पुण्याई मला लाभली.
माझ्या प्रकृतीची काळजी घेत मराठा समाजाच्या प्रतिनीधींनी दाखवलेली समयसूचकता, प्रिंटमिडीया, व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी या उपोषणाच महत्व जाणून दिलेल कव्हरेज, तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांनी केलेला उठाव हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहेत.
आपल्या सर्वांचे प्रेम आणि सदभावना वृध्दिंगत राहो, जेणेकरून मला या महाराष्ट्राची, देशाची अधिकाधिक सेवा करण्याची उर्जा मिळेल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.