Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार

Mar 2, 2022

मराठा समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते त्या उपोषणात सक्रिय सहभागी होऊन नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर व मनमाड येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ मराठा महासंघाचे पदाधिकारी आमरण उपोषणास बसले होते.
मराठा समाज आज अनेक समस्यांनी ग्रस्त झाला आहे मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसागणिक खालावत चालली आहे अशातच मराठा आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने त्यात आणखीन भर पडली आहे आरक्षण केव्हा मिळेल याची आज शाश्वती नाही,मराठा समाजाला यातून थोडाफार आधार मिळावा म्हणून युवराज संभाजी राजांनी एकूण 15 मागण्या गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा सातत्याने करत होते परंतु महाराष्ट्र शासनाने प्रतिसाद न दिल्याने शेवटी राजेंना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला या आंदोलनात मनमाड व नांदगाव च्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते आंदोलनाची दहाकता बघून शासनाने अखेर तिसऱ्या दिवशी राज्यांच्या सर्व एकूण 15 मागण्या पूर्ण केल्याचे लेखी पत्र दिले आहे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनमाड व नांदगाव च्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली प्रयत्नांची पराकाष्टा करीत आंदोलन यशस्वी केले म्हणून लक्ष्मी नगर (वाडी) गावचे थेट सरपंच बापूसाहेब जाधव,महेंद्र लोखंडे व ग्रामस्थांनी महासंघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झाल्टे,नांदगाव तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, ता.उपाध्यक्ष विशाल वडघुले,उपाध्यक्ष डॉ. विनोद डमरे,मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण, मनमाड शहर उपाध्यक्ष नानासाहेब घुमरे,व शिवभक्त सौ.संगिताताई सोनवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता.अध्यक्ष निलेश चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

तसेच मांडवड गावाचे शिवबा ग्रुपचे अध्यक्ष श्री अशोकभाऊ निकम यांनी मांडवड येथे आमरण उपोषण कार्यात युवराज संभाजी राजे छत्रपती यांना साथ देणारे मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार केला यावेळी आमरण उपोषण कर्त्यांनी आपल्या मनोगतात मांडताना सांगितले की या ठिकाणी येऊन मराठा महासंघाची भूमिका मांडता यावी यामुळे हा सत्कार आम्ही स्वीकारला आहे यावेळी लक्ष्मीनगर चे थेट सरपंच बापूसाहेब जाधव शिवबा ग्रुपचे अध्यक्ष अशोकभाऊ निकम ,महेंद्र लोखंडे आर्मी मॅन साहेबराव जाधव,इंजिनिअर सागर आहेर,संदिप आहेर,शंकर आहेर,भास्कर आहेर व इतर बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, पोलीस ठार...

read more
मनमाड नगर परिषद आणि सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

मनमाड नगर परिषद आणि सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

मनमाड - (राजेंद्र धिंगाण)स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२३, माझी वसुंधरा अभियान -४.० अंतर्गत मनमाड नगर...

read more
शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

नाशिक – शहर आणि जिल्ह्यातील लाचखोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच असून काल नाशिक शहरातील खासगी शाळेचा...

read more
के आर टी हायस्कूल चे योगासन स्पर्धेत यश मनमाड येथील के आर टी हायस्कूल चे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत यश

के आर टी हायस्कूल चे योगासन स्पर्धेत यश
मनमाड येथील के आर टी हायस्कूल चे तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत यश

मनमाड येथे 11 सप्टेंबर रोजी सेंट झेवियर हायस्कूल येथे तालुकास्तरीय योगासन 14.17.19 वर्षाखालील मुला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]