loader image

शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

Sep 14, 2023


नाशिक – शहर आणि जिल्ह्यातील लाचखोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच असून काल नाशिक शहरातील खासगी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक दिगंबर अर्जुन साळवे ५० हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत १३ डिसेंबर २०१९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील कनिष्ठ लिपीक साळवे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५० हजार रुपयाची लाचेची मागणी करून ती आज १३ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वीकारली.
सापळा कारवाई*
*युनिट – नाशिक
*तक्रारदार-* पुरुष
*आलोसे-१) दिगंबर अर्जुन साळवे , कनिष्ठ लिपिक, शिक्षण उप संचालक कार्यालय,
नासिक, वर्ग ३, वय – ५५ वर्षे. रा. टाकळी, भीमशक्ती नगर, नाशिक
*लाचेची मागणी– 50,000/- रुपये दिनांक 08/09/2023
*लाच स्विकारली- 50,000/ – रुपये दिनांक 13/09/2023
*हस्तगत रक्कम-* 50,000/- रुपये

लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. 13/12/2019 पासून ते 31/12/2022 पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक 1/1/2023 पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील आलोसे, कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50,000/- रुपये लाचेची मागणी करून ती आज दि. 13/9/2023 रोजी पचासमक्ष नासिक शिक्षण उप संचालक कार्यालयात स्वीकारली. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.सापळा अधिकारी – अनिल बडगुजर
पोलिस उप अधीक्षक,
,ला.प्र.वि. नाशिक. मोबा.नं. 8999962057
सापळा पथक
पो.ना, मनोज पाटील
पो.ना दिपक पवार
म पो.अम. शितल सूर्यवंशी


अजून बातम्या वाचा..

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.