Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Mar 5, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया हे होते. याप्रसंगी माननीय पर्यवेक्षिका सिस्टर शैला, फादर लॉईड, इयत्ता दहावी अ चे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळेसर, दहावी ब चे वर्ग शिक्षक श्री. केशव आचारेसर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रियंका साळी मॅडम, दहावी अ, ब चे मॉनिटर्स आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमरा पटेल व सायली चकोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. आयुष बोराडे याने केले. याप्रसंगी कु.कुणाल शिरसाठ,कु.प्रांजली आहिरे, कु.विनय आहिरे या विद्यार्थ्यांची भाषणे झालीत तर शाळेचे मा.मुख्याध्यापक फा. सॅबी कोरीया व दहावीचे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळे सरांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात.शालेय गायकवृंदाने, ‘चलते चलते ये मेरे गीत याद रखना’ हे गीत सादर करून वातावरण भावविभोर केले.

अजून बातम्या वाचा..

पहिल्याच दिवशी मनमाड रेल्वे स्थानकात सर्वसाधारण प्रवाशी तिकीटाची साडेसात लाखाची विक्री

पहिल्याच दिवशी मनमाड रेल्वे स्थानकात सर्वसाधारण प्रवाशी तिकीटाची साडेसात लाखाची विक्री

सुमारे अडीच वर्षानंतर रेल्वेची प्रवाशांसाठी सर्वसाधारण तिकिट सेवा बुधवारपासून सुरू झाली . आणि...

read more

(बघा व्हीडीओ)मुख्यमंत्री पदी एकनाथजी शिंदे : मनमाडला पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ...

read more

(बघा व्हीडीओ) नांदगाव शहर शिवसेना शिंदे गट व भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

नांदगाव : भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट युतीचे एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]