loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या नामांकित सिद्धी क्लासेसचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

Jul 1, 2022



गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मनमाड शहरात कार्यरत असलेल्या सिद्धी क्लासेसचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकाल लागला. निकालाची तसेच गुणवंत विद्यार्थी घडविण्याची परंपरा अखंडपणे चालू असून याही वर्षी सिद्धी क्लासेसची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी रविराज पाटील ही विद्यार्थिनी सेमी माध्यमात मनमाड मध्ये प्रथम आली. सिद्धी क्लासेसच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याप्रसंगी नांदगाव तालुक्याचे माजी आमदार श्री जगन्नाथ धात्रक तसेच मनमाड मधील ख्यातनाम अस्थिरोग तज्ञ अथर्व एक्सीडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शांताराम कातकडे व मनमाड मधील सुप्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ञ शतायु हॉस्पिटलचे संचालक डॉ निलेश पवार, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक व छत्रे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रवीण व्यवहारे सर,झी 24 तास चे पत्रकार श्री निलेश वाघ,आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे बंधू आशिष पाराशर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉक्टर श्री शांताराम कातकडे यांनी क्लासच्या विद्यार्थ्यांना वेळेचे,नियोजनाचे आणि अभ्यास ताण विरहित कसा करू शकतात याचे मार्गदर्शन केले तसेच 11वि 12 वि विज्ञान मध्ये ही सिध्दी क्लाससेस भरारी घेईल व मनमाड पॅटर्न तयार करेल अशा मोरपंखी शुभेच्या दिल्या तर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे डॉ निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले ,प्रवीण व्यवहारे यांनी सुद्धा अभ्यासाबरोबर वैयक्तिक खेळाला महत्व द्यावे तर माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी कलासच्या नियोजनाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दी क्लासेसच्या विद्यार्थिनी देवयानी वाघ,समीक्षा आहेर,श्रावणी गवळी,समृद्धी वाघ,श्रावणी काळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धी क्लासेसच्या अकरावी बारावी विज्ञान क्लासच्या प्राध्यापक सौ राजनोर मॅडम यांनी केले मान्यवरांचा परिचय अकरावी बारावी विज्ञान क्लासच्या प्राध्यापक श्री अमोल सानप सर यांनी व भौतिक शास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री मयूर सर यांनी करून दिला. मान्यवरांचा सत्कार सिद्धी क्लासेसचे संचालक डॉक्टर भागवत दराडे यांचे हस्ते करण्यात आला सिद्धी क्लासेस च्या संचालिका प्राध्यापक सौभाग्यश्री दराडे यांनी त्यांनी 11वि 12वि NEET ,CET पॅटर्न ची माहिती दिली,पालकांमध्ये श्री शिणकर सर व विद्यार्थ्यांन मध्ये सुजल खरोटे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.