Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

करंजवण योजनेसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न : धात्रक

Mar 6, 2022

शहरासाठी जीवनदायिनी असलेल्या करंजवन योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात अभिवादन रॅली काढत महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत योजनेसाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात येऊन एकजुटीने काम केल्याने यश मिळाले मनमाड शहरावर असलेला पाणीटंचाईचा कलंक पुसला जाणार असल्याचे प्रतिपादन गटनेते गणेश धात्रक यांनी पत्रकार परिषदेत केले

करंजवन योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे शहरात सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन रॅली काढण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं, भाजपा आशा सर्वपक्षीय नगरसेवक, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी होत आम्ही मनमाड शहरासाठी आणि शहराच्या पाणीप्रश्नासाठी सर्वजण एकत्र आहोतचा संदेश दिला यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवानी यांनी गणेश धात्रक, राजेंद्र आहिरे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे,  शिवसेनेचे नगरसेवक पिंटू शिरसाठ, लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर, किरण शिंदे, विलास कटारे, विजय मिश्रा, एड सुधाकर मोरे, सुनील हंडगे, गोटू केकान,  दिनेश घुगे, रवी खोटरे, राजेंद्र आहेर, विक्की सुरवसे, इरफान मोमीन,  काँग्रेसचे शहराध्यक्ष अफजल शेख, बब्बू कुरेशी, अशोक व्यवहारे, भीमराव जेजुरे, रिपाइंचे दिनकर कांबळे, संजय मोरे, राष्ट्रवादीचे हबीब शेख, धंनजय कमोदकर, पापा थॉमस, डॉ प्रताप गुजराथी, भाजपचे नितीन परदेशी, एकनाथ बोडखे, फिरोज शेख, सुषमा तिवारी, पुंडलिक कचरे, आदी उपस्थित होते

पत्रकार परिषद ..

यावेळी देवी मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले गटनेते गणेश धात्रक, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, प्रमोद पाचोरकर, नाजीम शेख, विजय मिश्रा, विलास कटारे, बब्बू कुरेशी, हबीब शेख शिंदेचे सचिव नितीन लालसरे उपस्थित होते धात्रक म्हणले की  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाडच्या पाणीप्रश्नावर लक्ष घालून करंजवन योजनेस मंजुरी दिली अनेकांनी यासाठी प्रयत्न केले कुण्या एका व्यक्तीचे काम नाही सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, आमदार सुहास कांदे, सरकारी अधिकारी, मनमाड बचाव कृती समितीचे पदाधिकारी, एड सागर कासार, नितीन लालसरे यांनी प्रयत्न केले योजना मंजूर झाल्यामुळे शंभर टक्के पाणी येणार आम्ही पदावर असो वा नसो पण पाणी आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र एकजुटीने काम करू सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे कौसिलने एकमताने ठराव मंजूर केला कोणी विरोध केला नाही म्हणून ही योजना पुढे मंजुरी पर्यंत पोहचली यासाठी अनेकदा मंत्रिमंडळाच्या पायऱ्या झिजवल्या, त्रुटी, अटी पूर्ण केल्या, पालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना पंधरा कोटी हप्ते करून भरले शासनाला एकच विनंती आहे की  ठरलेल्या किंमती पेक्षा जास्त झालेल्या खर्चाची तरतूद पाणीपुरवठा योजनेलाही करावी जशी बांधकाम, पंतप्रधान योजनेलाही लागू आहे त्याप्रमाणे करावी पालिकेवर वाढीव बोजा पडणार नाही करंजवनचे पाणी आल्यानंतर एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश धात्रक यांनी सांगितले

अजून बातम्या वाचा..

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]