Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ना.एकनाथ शिंदे यांचा मनमाडच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार

Mar 6, 2022

मनमाड शहरासाठी जीवनदायिनी असलेल्या करंजवन योजनेला प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नगर परिषद आणि सर्वपक्षीयांतर्फे सत्कार करत आभार मानण्यात आले योजनेला पुढे चालना मिळावी यासाठी साकडे घालण्यात आले

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव येथे आले असता यावेळी सर्व माजी नगरसेवकांनी आणि सर्वपक्षीयांनी भेट घेत चर्चा केली यावेळी आमदार सुहास कांदे हे देखील उपस्थित होते
गेल्या ४५ वर्षांपासून मनमाड शहर पाणीटंचाईने बेजार झाले आहे आजही शहरात १५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो पालखेड धरणाचे आवर्तन मिळण्यास उशीर झाला तर पाणीपुरवठ्याचे दिवस वाढले जातात शहराची भीषण पाणीटंचाई पाहता करंजवन योजना पुढे आली आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करत योजनेतील बाबी त्रुटी पूर्ण केल्यामुळे आपण योजना पूर्ण केल्यामुळे मनमाड शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे एमआयडीसी झाल्यास इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल विकासाला अधिक गती येईल त्यामुळे महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि आपण यात लक्ष घालून योजनेला मंजुरी दिल्यामुळे मंत्री शिंदे यांचा शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन नगर पालिका, माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीयांतर्फे आभार मानण्यात आले करंजवन योजनेला गती मिळून अधिक चालना मिळावी यासाठी साकडे घालण्यात आले यावेळी
गटनेते गणेश धात्रक, नगरसेवक साईनाथ गिडगे, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, लियाकत शेख, नाजीम शेख, विजय मिश्रा, सुधाकर मोरे, सुभाष नहार आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]