Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक व्याख्यान संपन्न

Mar 7, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक व्याख्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. निधी भन्साळी यांनी ‘मुलींची बदलती जीवनशैली व आहार’ या विषयावर व्याख्यान दिले. डॉ.भन्साळी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आपले आहार जर संतुलित नसेल तर त्याचे जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य ढासळते. त्यामुळे आपले आहार हे संतुलित असावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पी बी परदेशी यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा वर्षाराणी पेडेकर व आभार प्रदर्शन प्रा. कविता कांखडकी यांनी केले. या कार्यक्रमास निओप्रेरणा फाउंडेशनचे श्री सतीश बागुल व श्री कमलेश पवार तसेच प्रा आरती छाजेड व विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्ष, निओ प्रेरणा फाऊंडेशन यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]