Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एकदिवसीय कसोटी सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाचा न्यू एकता संघावर दणदणीत विजय

Mar 7, 2022

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी ने पहिल्या डावाच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर विजय प्राप्त केला. एकदिवसीय कसोटी सामन्यामध्ये मनमाड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेवून ४२ षटकांमध्ये ५ बळी गमावून २११ धावा केल्या व डाव घोषित केला.मनमाड संघाच्या अद्वैत पारेख याने सर्वाधिक ९४ चेंडूत ६७ धावा तसेच आयुष व्यवहारे याने ५८ चेंडूत ३७ धावा,मयूर शिंदे ५० चेंडूत २४ धावा बनवल्या. प्रत्युत्तरात नाशिक संघाने फक्त ९४ धावाच करू शकला. मनमाड संघाच्या वतीने गोलंदाजीत आयुष व्यवहारे ने सर्वाधिक ५ बळी तसेच कुशाल परळकर ने ३ बळी व साक्षी शुक्ला याने १ बळी घेत आपल्या संघाला योगदान दिले. पुन्हा एकदा नाशिक संघाला फलंदाजी साठी आमंत्रित केल्यावर नाशिक संघाने दिवसअखेरीस ३ बळी गमावून ४९ धावा करू शकला. सार्थक शिंदे याने २ बळी व कुशाल परळकर याने एक बळी घेत आपल्या संघाच्या विजयात वाटा घेतला. सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणारा आयुष व्यवहारे सामनावीर ठरला.भूमी क्रिकेट अकॅडमी चे संचालक व कोच सिद्धा रतग

कोच सिद्धार्थ रोकडे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, राजाभाऊ पगारे,भाऊ पाटील,इरफान मोमीन ,श्रेणिक बरदिया,भूषण शर्मा, वाल्मीक रोकडे,परवेझ शेख,कौशल शर्मा, हबीब शेख, शुभम गायकवाड, सिद्धार्थ बरदीया,नितीन आहेराव, ठोंबरे सर, रब्बानी शेख सर, जविद सर, परेश राऊत,gls ग्रुप यांनी विजयी संघाचे तसेच सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]