Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे जागतिक महिलादिनी “सन्मान सवित्रीच्या लेकींचा” कार्यक्रम संपन्न

Mar 10, 2022

दिनांक 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने "सन्मान सावित्रीच्या लेकींचा " या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना, येवला तर्फे तालुक्यातील कर्तुत्ववान व गुणवंत महिला शिक्षिकांचा आणि तालुक्यातील कला क्रीडा व सांस्कृतिक तसेच नवोदय व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. " सन्मान सावित्रीच्या लेकीःचा या संकल्पनेतंर्गत येवला तालुक्यातील 18 केंद्रातून 18 उपक्रमशील महिला शिक्षिकांची निवड करण्यात आली.यामध्ये संगिता महाजन, पार्वती केंद्रे, मंजुषा भोईर, शशिकला झाल्टे, सविता कर्डीले, रिनल जैन, वर्षा लांडगे, किशोरी नाकोड, रेखा बाविस्कर, संगिता कडलग, मनिषा वाकचौरे, रेश्मा शिरसाट, शितल कांबळे, सिमा बोढारे, माधुरी खारे, कल्पना माने, सुशिला गुंड, प्रियंका वाघ इ. गुणवंत महिला शिक्षिकांचा समावेश होता. तसेच गुणवंत विद्यार्थी यामध्ये ऋचा मुंगसे, समिक्षा सोळसे, समर्थ शेळके, सोहम फड, साई अमोल वाघ, गायत्री बारहाते, आम्रपाली पगारे, श्रीजा झरेकर, दिव्या खळे, शौर्य कलगुंडे, श्रेयश देवकते, मनस्वी अहिरे, वृषाली गावित, स्मिता वाघ, सोनिया पगारे यांचा सन्मान करण्यात आला.तर विठ्ठल तळेकर या सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी येवला नगरीतील सुप्रसिद्ध वैदयकीय रत्न महाराष्ट्र शासनाचे वैदय राज पुरस्कार प्राप्त तज्ञ डाॕ आ. श्री सुरेश कांबळे सर यांचे " महिलांचे आरोग्य समज गैरसमज " या विषयावर प्रभावी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्येने कर्मचारी व महिलांनी उपस्थीत राहुन या अनमोल व्याख्यानाचा आस्वाद घेतला. या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब संघटनेच्या विभागीय कार्याध्यक्षा तथा नगरसेवीका न प धुळे सौ. वंदनाताई भामरे, उद्घाटक म्हणुन महाराष्ट्र राज्याचे आतिरिक्त सरचीटणीस श्री प्रभाकर पारवे तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागिय अध्यक्ष श्री महेश अहिरे सर उपस्थित होते. तसेच विचारमंचावर न प येवला मुख्याधिकारी श्रीमती संगिता नांदूरकर, येवला पंचयत समितिचे सभापती प्रविणभाऊ गायकवाड, नाशिक जि प सदस्य महेंद्र काळे, सुप्रसिद्ध वैद्यकिय अधिकारी डॉ सुरेश कांबळे ,वैदयकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालयाचे डॉ ज्ञानेश्वर सोनवणे,अध्यापकभारती व मुक्तीभूमी वाचनालय,अभ्यासिकेचे संस्थापक शरद विमल दिनकर शेजवळ ,अखिल भारतीय आदिवासी, भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री शरद राऊळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटिल व तसेच तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी ,सर्व केंद्रप्रमुखमोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री पुंजाराम पगारे उपाध्यक्ष श्री सोमनाथ खळे सरचिटणीस श्री अमर गावित, कार्याध्यक्ष श्री सचिन वाव्हळ कोषाध्यक्ष श्री शरद अहिरे, प्रमुख मार्गदर्शक गोकुळ वाघ, शंकर जाधव, दिपक कु-हाडे, राजेंद्र दुनबळे, सहसचिव श्री बाबासाहेब धिवर,संतोष सोनवणे, पांडुरंग भालेराव, महेश वारभोग, माधव कोकणी,धम्मदिप कावळे,संजय चौधरी, नितीन गावित, योगेश्वर वळवी, छगन पवार, सुभाष वाघेरे, अर्जुन घुसळे, किशोर म्हस्के, संतोष गावित,वंजी कुंवर,विलास सानप, ललित वाकचौरे, रवि गंगातिवरे,अशोक शिसव, लक्ष्मण जुंधरे, योगेश त्रीभुवन, कसबे सर, राजु पाटीला, तसेच महिला पदाधिकारी शितल पावले, जयश्री पालवे, शितल कांबळे, योगिता जगताप, शशिकला झाल्टे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री सोमनाथ खळे यांनी तर सुत्रसंचलन शंकर जाधव व श्रीमती योगिता जगताप यांनी केले. आभार प्रदर्शन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष पुंजाराम पगारे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]