Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड नगरपरिषद निवडणूक : प्रभाग रचना जाहीर

Mar 10, 2022

मनमाड नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी आज निवडणूक आयोगच्या वतीने मनमाड शहराची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली .

या प्रभाग रचनेनुसार एकुण 80,058 मतदार असुन एकुण 16 प्रभागामध्ये 33 नगरपालिका सदस्य असणार आहे. प्रत्येकी 2 सदस्य असणारे 15 प्रभाग व 16 व्या प्रभाग मध्ये एकुण 3 सदस्य असणार आहे. प्रभागाची रचना आणि एकुण मतदार संख्या पुढील प्रमाणे :-

● प्रभाग क्रमांक : 1 , एकुण मतदार संख्या 4764 , समाविष्ट भाग : हनुमान नगर ,तिवारी वाडी , भाबड वस्ती, डोणगाव रोड परिसर , सगळे गॅस पंप मागील भाग , शिक्षक कॉलनी , विवेकानंद नगर

●प्रभाग क्रमांक : 2 , एकुण मतदार संख्या 4822 , समाविष्ट भाग :आंबेडकर नगर , सिकंदर नगर , किर्ती नगर , कोतवाल नगर ,बुरुकुलवाडी भाग

●प्रभाग क्रमांक : 3 , एकुण मतदार संख्या 5077 , समाविष्ट भाग : पॉवर हाऊस औद्योगिक वसाहत , एफ.सी. आय.कॉर्टर , गर्डर शॉप , सटाणा रोड , चंदन वाडी

●प्रभाग क्रमांक : 4 , एकुण मतदार संख्या : 4995 , समाविष्ट भाग : विवेकानंद नगर नं.1 , आंबेडकर चौक , आंबेडकर बोर्डिंग , माऊली नगर , सिद्धार्थ हौसिंग सोसायटी

●प्रभाग क्रमांक : 5 , एकुण मतदार संख्या : 4822 , समाविष्ट भाग : बुधलवाडी , राजवाडा , माधव नगर ,मुरलीधर नगर , पांडुरंग नगर , सनजीत हौसिंग सोसायटी , विवेकानंद नगर इत्यादी.

●प्रभाग क्रमांक : 6 , एकुण मतदार संख्या : 4372 , समाविष्ट भाग : आय. यु.डी. पी. , प्रोफेसर कॉलनी , मनोरम सदन भिंत , ललवाणी रो-हाऊस प्लॉट , गुजर कोचिंग क्लासेस

●प्रभाग क्रमांक : 7 , एकुण मतदार संख्या : 4429 , समाविष्ट भाग : टक्कार मोहला , मनोरम सदन झोपडपट्टी , हुसेनी चौक ,जामा मस्जिद परिसर , कोर्ट रोड , नुर चौक परिसर , राजवाडा , रोहिदास वाडा , कुंभार वाडा , शनी मंदिर , बालाजी मंदिर , भिलाटी परिसर

●प्रभाग क्रमांक : 8 , एकुण मतदार संख्या : 5096 , समाविष्ट भाग : डीसोझा मैदान , बोहरी कंपाऊंड , पोलीस कॉर्टर , रेल्वे वर्कशॉप परिसर , नजराना सोसा., हबीब नगर , आनंद वाडी भाग ,
कारंडे वाडी , क्रांती नगर इत्यादी.

●प्रभाग क्रमांक : 9 , एकुण मतदार संख्या : 4601 , समाविष्ट भाग : मुक्तांगण परिसर , गांधी चौक परिसर , रेल्वे स्टेशन परिसर , माणके कंपाउंड , सराफ बाजार

●प्रभाग क्रमांक : 10 , एकुण मतदार संख्या : 4554 , समाविष्ट भाग : जमधाडे चौक , 52 नंबर , फुले चौक भाग परिसर , ललवाणी बिल्डींग परिसर , सावित्रीबाई फुले मार्केट इत्यादी.

●प्रभाग क्रमांक : 11 , एकुण मतदार संख्या : 4601 , समाविष्ट भाग : गवळी झोपडपट्टी , नेहेरू भवन , गुरुद्वारा परिसर , आनंद विहार परिसर , स्वीपर कॉलनी , इदगाह परिसर

●प्रभाग क्रमांक : 12 , एकुण मतदार संख्या : 4905 , समाविष्ट भाग : संभाजी नगर , वसंग हौसिंग सोसायटी , हुडको परिसर , केशव हाऊसिंग सोसायटी , शिवाजी नगर नंबर 1 , सिद्धिविनायक नगर , डी. के. पगारे नगर

●प्रभाग क्रमांक : 13 , एकुण मतदार संख्या : 5277 , समाविष्ट भाग : हुडको भाग , कुलथे कॉलनी , केकाण नगर , दरगुडे वस्ती , आश्विनी नगर , शिवाजी नगर नंबर 2 , महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी

●प्रभाग क्रमांक : 14 , एकुण मतदार संख्या : 4788 , समाविष्ट भाग : रमाबाई नगर , भारत नगर , रेल्वे कॉलनी , पंचवटी विभाग , वडार वस्ती , रेल्वे स्टेशनचा लागुन दक्षिण भाग

●प्रभाग क्रमांक : 15 , एकुण मतदार संख्या : 5338 , समाविष्ट भाग : शकुंतला नगर , बेंद्रे चाळ , सर्व्हे नंबर 153 , सर्व्हे नंबर 141 , 28 युनिट , कातकडे वस्ती , ट्रेनिंग कॉलेज परिसर , शाळा नंबर 14 , कॅम्प विभाग

●प्रभाग क्रमांक : 16 , एकुण मतदार संख्या : 7617 , समाविष्ट भाग : शांती नगर , महानंद नगर , श्रावस्ती नगर , गोपाल नगर , वेलकंणी नगर , आदर्श नगर , जनार्दन नगर , कॅम्प पश्चिम भाग.

या प्रमाणे प्रत्येक प्रभागाची व्याप्ती , एकुण मतदार संख्या आणि समाविष्ट भागाची संपूर्ण माहिती आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत करण्यात आली आहे.

आज मनमाड नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने नगरपरिषदेमधील आपले भावी नगरसेवक होण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार आणि राजकिय पक्ष जोरात सक्रिय झाले आहे .

अजून बातम्या वाचा..

अन्यथा…आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

  आज 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती...

read more

वेटलिफ्टींग खेळाडू नूतन बाबासाहेब दराडे हीची मनमाड नगर परिषदेतर्फे स्वच्छता राजदूत म्हणून नियुक्ती

मनमाड शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२२ अंतर्गत...

read more
निस्पृह आणि विश्वासार्ह पत्रकारता करावी – ना.दादा भुसे. मनमाड नांदगाव शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बनविण्याचा मानस – आ. सुहास कांदे

निस्पृह आणि विश्वासार्ह पत्रकारता करावी – ना.दादा भुसे. मनमाड नांदगाव शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बनविण्याचा मानस – आ. सुहास कांदे

नांदगाव शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बनविण्याचा मानस आहे असे सूतोवाच आमदार सुहास कांदे यांनी...

read more

बोलठाण गावचा लाडका भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला अमोलदादा हिम्मतराव पाटील यांना वीरमरण

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नांदगाव तालुक्यातील बोलठाण चे भूमिपुत्र अमोल हिम्मतराव पाटील हे...

read more

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more

कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी

कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]