चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाकरीता चांदवडच्या नायब तहसीलदार डॉ.सौ.मिनाक्षी भगीरथ गोसावी व सौ. कल्याणी सचिन कुलकर्णी (वकील, चांदवड कोर्ट) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असलेल्या अंतर्गत तक्रार समितीद्वारे करण्यात आले. या प्रसंगी चांदवडच्या नायब तहसीलदार डॉ.सौ.मिनाक्षी भगीरथ गोसावी बोलतांना, त्यांनी महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना “शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता” या विषयावर मार्गदर्शन केले. समानता केवळ पुरुषांनीच नव्हे तर स्त्रियांनीही समजून घेतली पाहिजे. समानता हा शब्द आपण अगदी सहज वापरतो, पण आपल्या वागण्यात तो सहजासहजी येत नाही,असे त्यांनी संबोधित केले.त्याचप्रमाणे संस्थेत मुलींसाठी पोस्टर, रांगोळी आणि महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित केल्या तसेच विजेत्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अंतर्गत तक्रार समिती अध्यक्ष ,अधीव्याख्याता सौ .नीरजा प्रसाद यांनी तुमचे बोल आम्हास खूप प्रेरणादायी आणि प्रभावी ठरतील, या शब्दात प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. तसेच अधीव्याख्याता कु. ए. एस. चोरडिया, सौ . ए. एस. माळी, कु. आर.आर.सोनवणे, सौ .के.एस.सोनवणे ,सौ .यू.एस.काळे यांचे मोलाचे साह्य लाभले. सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहकारी व तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेद्रकुमारजी बंब यांनी या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले .











