Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सौ.सुशीलाबाई चंद्रभानजी बागरेचा प्राथमिक शाळेत पालक मेळावा संपन्न

Mar 11, 2022

मनमाड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित बालवाडी व सौ. सुशिलाबाई चंद्रभानजी बागरेचा प्राथमिक शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्याला श्री.भाई उपाले (विद्या भारती शिशूवाटीका प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र )यांनी “बालकांच्या समग्र विकासात पालकांची भूमिका “या विषयावर मार्गदर्शन करीत 3 ते 6 या वयोगटातील बालकांना हाताळतांना पालकांनी कशा पद्धतीने आपली भूमिका बजवावी. याविषयी अतिशय महत्वाचे विचार मांडले यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच पालकांना मदत होणार आहे. त्यांच्यासोबत नाशिकहुन आलेल्या प्रमुख अतिथी सौ.सविता कुलकर्णी व सौ स्मिता कुलकर्णी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शालेय समितीचे चेअरमन डॉ. श्री नुतन पहाडे, ज्येष्ठ संचालक गुरमीतसिंग कांत, श्री सदगीर साहेब ,श्री.रमाकांत मंत्री,श्री पी.बी. कुलकर्णी सर , बालमंदिरचे अधिक्षक श्रीवास्तव सर ,सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक उपासनी सर .सौ सोनवणे मॅडम हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेवाळे मॅडम यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.

म.रे.मा.विद्यालयाचे “श्री.गद्रे सरांनी सुत्रसंचालन केले. शाळेतील शिक्षक श्री.साळवे सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या शिक्षिका श्रीमती बिरारी मॅडम,सौ. भोपळे ,सौ बाविस्कर मॅडम, श्रीमती शर्मा मॅडम सौ जोशी मॅडम तसेच सेविका श्रीमती घोडेराव बाई ,सौ.सिलेलान बाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मुक्तिभूमीसाठी मनमाड बस आगारातून बारा बसेस सोडणार – रीपाई च्या मागणीची तत्काळ दखल

मुक्तिभूमीसाठी मनमाड बस आगारातून बारा बसेस सोडणार – रीपाई च्या मागणीची तत्काळ दखल

मनमाड : येवल्यातील प्रसिद्ध मुक्तीभूमी येथील धर्मांतर घोषणेला यंदा ८४ वर्षे पूर्ण होत असून, येत्या...

read more
छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व छत्रे विद्यालय आयोजित नाशिक...

read more
न्यायडोंगरी येथील डॉ. पत्नीचा अपघाताचा बनाव डॉक्टर पतीसह वडीलावर खुनाचा गुन्हा दाखल

न्यायडोंगरी येथील डॉ. पत्नीचा अपघाताचा बनाव डॉक्टर पतीसह वडीलावर खुनाचा गुन्हा दाखल

नांदगाव सोमनाथ घोगांणे  नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात गेल्या सहाच दिवसापूर्वीच एका पत्नीने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]