Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठा समाज बांधवांचा मा.आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते सत्कार!!

Mar 11, 2022

मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या प्रलंबीत मागण्यांकरीता युवराज संभाजी राजे छत्रपती मुंबई येथील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारी 2022 रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली होती. या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहभागी होऊन आमरण उपोषणास बसले होते, समाजाचा आक्रोश आणि आंदोलनाची तीव्रता पाहून शेवटी तीसर्या दिवशी शासनाने समाजाच्या 15 मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. गेल्या दोन वर्षांपासून युवराज संभाजी राजे या 15 मागण्या घेऊन शासनाकडे पाठपुरावा करीत होते,परंतु शासन कधी कोरोणा महामारी तर कधी इतर कारणे देऊन चालढकल करत होते, शेवटी राजेंना आंदोलन करावे लागले, याची सल मराठा समाजाच्या मनात राहून गेली. मराठा समाज आज अनेक समस्यांना तोंड देत आहे, अशा परिस्थितीत मराठा आरक्षण एका बाजूला न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे,अशा परिस्थितीत समाजाला कुठेतरी आधार मिळावा म्हणून राजेंनी समाजाच्या हिताच्या अशा 15 मागण्या घेऊन हे आंदोलन पुकारले होते. या यशस्वी आंदोलनाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव तालुक्याच्या वतीने घेण्यात आली म्हणून या आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या आंदोलनकारी आमरण उपोषण कर्त्याचा जाहिर सत्कार नांदगाव तालुक्याचे मा.आमदार पंकज भुजबळ व सहकारी यांच्या वतीने मनमाड येथे करण्यात आला. या प्रसंगी उपोषण कर्ते भास्कर झाल्टे,भिमराज लोखंडे, विशाल वडघुले, डॉ. विनोद डमरे,सौ.संगिताताई सोनवणे, विष्णु चव्हाण, नानासाहेब घुमरे, निलेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हासराव देशमुख (तात्या) व सकल मराठा समाजाचे जेष्ठ रतन निकम सर यांचाही सन्मान करण्यात आला. या सत्काराचे आयोजन करण्यासाठी विनोद शेलार,अक्षय देशमुख,बाळासाहेब जाधव,नानासाहेब शिंदे,राजाभाऊ जाधव,प्रकाश बोदक,हबीब शेख,मा.नगराध्यक्ष योगेश पाटील,काँ.रहेमान शहा आदि मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]