Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 2 तलवारी जप्त

Mar 11, 2022


दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार मनमाड पोलिस उपविभागीय अधिकारी श्री समीर सिंह साळवे यांच्या आदेशान्वये येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे यांच्या उपस्थितीमध्ये अलीकडेच येवला शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले काही दिवसांपूर्वी येवला शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना सलग घडल्या होत्या यात आगामी सण-उत्सव या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यासाठी प्रामुख्याने हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील जुन्या पंचायत समिती समोरून संशयित आरोपी भूषण हिरे यांच्या ताब्यातून दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या यानंतर लक्कडकोट भागातून 15 मोटरसायकल सह ओमनी कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच वाहने मूळ मालकांना परत केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे
या कोम्बिंग ऑपरेशन च्या कारवाईसाठी येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, यांच्यासह 22 पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी व दहा होमगार्ड आदींनी ही कारवाई केली आहे

अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]